Pune News : पुणे : महाराष्ट्रातून सुरू झालेल्या चारही गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. राज्यातून सुरू झालेल्या चार ‘वंदे भारत’मधून बिलासपूर-नागपूर ‘वंदे भारत’ला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. मागील २५ दिवसांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेकडून अभ्यास करण्यात आला आहे.
सर्वाधिक प्रतिसाद
मुंबई ते सोलापूर आणि सोलापूर ते मुंबई या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाड्यांना पुणे ते मुंबई दरम्यान मोठा प्रतिसाद आहे. सोलापूरहून मुंबईसाठी आणि मुंबई ते सोलापूर थेट प्रवास करणाऱ्यांची संख्या २५ टक्केही नाही. मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट ‘वंदे भारत’पेक्षा कमीच आहे. त्यामुळे या मार्गावरील ‘वंदे भारत’चे तिकीट कमी करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.