Pune News : पुणे : पुणेकरांचेच नव्हे तर देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेत्यांप्रमाणे सेलिब्रेटी मंडळींनी देखील हजेरी लावली होती. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टतर्फे विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपामधून मिरवणुकीला सुरुवात झाली. याचवेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. त्याच उत्साहात विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून मार्गस्थ झाली. पांचाळेश्वर मंदिर घाटावर ८ वाजून ५० मिनीटांनी गणपतीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
विसर्जन मिरवणुकीत राजकीय नेते आणि सेलिब्रेटींची हजेरी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्याने श्री गणाधीश रथातून काढण्यात आली. (Pune News) विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने हा रथ उजळून निघाला होता.
बाप्पांच्या मिरवणूक रथामध्ये सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई चौघडा असा लवाजमा होता. टिळक चौकामध्ये रात्री ८ : २० च्या सुमारास दगडूशेठ गणपतीचे आगमन झाले. (Pune News) त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी विसर्जन झाले.
गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात पुणे गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक गणरायांचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत भव्य दिव्य देखावे पाहण्यास मिळाले. शहरात कोयता गँगचा बिमोड पुणे पोलिसांनी कसा केला, यावर विसर्जन मिरवणुकीत देखावा करण्यात आला होता. (Pune News) पुण्यातील कोयता गँगची चर्चा राज्यभर झाली होती. पुणे पोलिसांनी या कोयता गँगवर धडक कारवाई करत अनेकांना अटक केली. काही जणांवर मकोका लावला. ही सर्व दृश्य विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यातून साकारण्यात आली होती.
विसर्जन मिरवणूक गुरुवारी सकाळी १० वाजता सुरु झाली. गेल्या २१ तासांपासून मिरवणूक सुरु आहे. रात्री १२ वाजल्यानंतर थांबलेला डीजेचे दणदणाट सकाळी ६ वाजताच पुन्हा सुरु झाला. (Pune News) शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर अद्यापही गणपती मंडळांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी… भक्तीमय वातावरणात मानाच्या बाप्पांना निरोप!
Pune News : पतीचे टोमणे व मारहाणीला कंटाळून, पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या