Pune News : पुणे : कौटुंबिक वादातून पतीने दारुच्या नशेत मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना आव्हाळवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी येथील माहेर संस्थेजवळ गुरुवारी (ता.३१ ऑगस्ट) पाहटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी कंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आव्हाळवाडीत प्रचंड खळबळ
दिपाली संदीप मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संदीप उत्तम मोरे (वय-४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप मोरे याला दारुचे व्यसन आहे. तो कौटूंबिक कारणातून सतत पत्नी दिपाली यांना मद्यप्राशन करून मारहाण करत होता. (Pune News) आरोपी संदीप मोरे हा बुधवारी (ता.३०) रात्री दहा वाजता दारू पिऊन घरी आला आणि. परत त्याने पत्नीसोबत वाद केला.
दरम्यान, आरोपी संदीप मोरे याने तिन्ही मुलांना त्याने एका खोलीत कोंडून ठेवले. तर पत्नीला हॉलमध्ये ओढत नेऊन जोरजोरात मारहाण केली. दिपाली यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. दिपाली मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. (Pune News) संदीप यानेच कपड्याने त्यांच्या तोंडावरील रक्ताचे डाग पसून फरशी स्वच्छ केली. कोणाला काही सांगितले तर पाहून घेण्याचा मुलांना दम दिला.
गुरुवारी मुलांनी घाबरत सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मामाला फोन केला. आणि सदर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. (Pune News) मामा आल्यानंतर मुलांनी आईला पाहिले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी संदीप मोरे याला अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पीटी शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग