Pune News : पुणे : कोणतेही कारण काढून खंडणी उकळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. खंडणी उकळण्यासाठी एका महिलेने अनोखी शक्कल लढवली. हॉटेल व्यावसायिकालाच मैत्रीच्या जाळ्यात ओढून एक लाख ८० हजार रुपयांची खंडणी एका महिलेने उकळली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एका हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. (Pune News) आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर खंडणीच्या लालसेपोटी महिलेने हॉटेल व्यावसायिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल व्यावसायिकाने तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, महिलेने हॉटेल व्यावसायिकाला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी दिली. तरीही हॉटेल व्यावसायिकाने तिच्या प्रत्येक कृत्याला नकार दिला.(Pune News) त्यानंतर संतप्त हॉटेल व्यावसायिकाकडे तिने दोन लाख रुपयांची मागणी केली. बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी तिने हॉटेल व्यावसायिकाला दिली. घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने तिला एक लाख २० हजार रुपये दिले.
हॉटेल व्यावसायिकाच्या घाबरण्याचा गैरफायदा घेत हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.(Pune News) हॉटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना तिने धमकावून शिवीगाळ केल्याचे हॉटेल व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होती. तिच्या धमकीमुळे घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Pune News : राज्यातील कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांच्या पगारात वाढ ; सात हजार कैद्यांना होणार लाभ..