Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय धोरणे आणि धरसोड वृत्तीवर बोट ठेवत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल अनेक धक्कादायक खुलासे केले. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगली असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांची प्रत्येक मतं खोडून काढली आहेत. डायरी लिहिण्याची मला लहानपणापासूनची सवय आहे. माझी डायरी माझा रेफरन्स पॉइंट आहे, असे म्हणत त्यांनी पर्समधून काही कागद काढले आणि भुजबळ कोणत्या मिटींगबद्दल बोलले? त्यामागचे संदर्भ काय? याची पडताळणी करून मुद्द्यांची यादीच वाचून दाखविली.
सुप्रिया सुळे यांनी भुजबळांची मतं खोडून काढली
या वेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझा नवरा काही बोलला तरी मी डायरीत लिहीते. त्यामुळे २ जुलैच्या शपथविधीच्या रात्री काय घडलं हे मी छातीठोकपणे सांगू शकते.(Pune News) मला सगळं धडधडीत आठवतंय. स्फोट होईल असं माझ्या आयुष्यात काहीही नाही. या वेळी सुळे यांनी भाजपचं नामकरण ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ म्हणजेच बी.जे.पी. असं केलं. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बेदखल करून, भाजप वेगळ्याच विषयांचे राजकारण करत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी त्यांच्या मुलाखतीत कबुली दिली आहे की अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि २ जुलैचा शपथविधी हे दोन्ही निर्णय त्यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतले आहेत. दोन्ही गोष्टी शरद पवारांना न सांगता केल्या होत्या.(Pune News) समाजात अनेकवेळा याबाबत चर्चा होते. परंतु, भुजबळांच्या कालच्या मुलाखतीतून स्पष्ट झालं आहे की या दोन्ही गोष्टी शरद पवारांना माहिती नव्हत्या. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असूनही अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची त्यांना कल्पना नव्हती. हे दोन्ही निर्णय त्यांना अंधारात ठेवून घेतले होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनेक जण शरद पवार यांच्या विचारधारेवर प्रश्न उपस्थित करतात. परंतु, छगन भुजबळांनी काल स्वतः सांगितलं, ‘अनेक वेळा आम्ही शरद पवारांना विनंती केली, आमची आणि भाजपाची चर्चा झाली, मात्र आम्ही निर्णयावर कधीच आलो नाही.’ याचाच अर्थ शरद पवार यांनी त्यांची विचारधारा सोडली नाही. शरद पवार त्यांच्या विचारांवर ठाम राहिले. (Pune News) मी काँग्रेसची साथ सोडणार नाही, काँग्रेसचा विचार सोडणार नाही, हीच शरद पवार यांची भूमिका कायम होती.
सुप्रिया सुळे यांनी या वेळी भाजपच्या भ्रष्टाचाराचा पुरावा देण्यासाठी समरजीत घाटगेंचे उदाहरण दिले. घाटगे यांनी नेत्यावर आरोप केला होता. आता मी घाटगे यांना नागरिक म्हणून विचारते, घाटगे तुम्ही जे आरोप केले ती व्यक्ती आज तुमच्याच जिल्ह्याची पालकमंत्री आहे. (Pune News) म्हणजे तुम्ही केलेले आरोप खोटे होते का? नसेल तर भाजपने आता त्यांची माफी मागितली पाहिजे. तुम्ही त्या नेत्याच्या घरी ईडी पाठवली. त्यांच्या बायको, मुलं आणि नातवांचा छळ केला. नंतर तुमच्यासोबत घेतलं. हा भ्रष्ट व्यवहार नाही काय? असा सवाल त्यांनी केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवे संचालक पार्थ पवार?