Pune News : पुणे : माणुसकीला काळीमा फासणारी घटना वानवडी परिसरात उघडकीस आली आहे. सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या छोट्या बहिणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यातून मुलीने एका बाळाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षांच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून सुरु होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मुळचे कर्नाटक येथे राहणारे आहे. (Pune News ) कामानिमित्त ते सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. फिर्यादी धुणी-भांड्यांची कामे करतात. तर पती व २४ वर्षांचा मुलगा वॉचमन म्हणून काम करतो. तर मुलगी शाळा शिकते.
आई-वडिल कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. या गोष्टीचा फायदा उठवून मोठ्या भावाने बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार केले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. परंतु, आई-वडिलांना घाबरून मुलीने ही गोष्ट घरच्यांपासून लपवून ठेवली. दरम्यान, मंगळवारी मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे आई तिला रुग्णालयात घेऊन नेली. त्यावेळी आपली मुलगी गर्भवती असल्याचे आईला कळले. (Pune News ) काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला.
याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे महापालिकेअंतर्गत दवाखान्यांत गणेशोत्सव काळात विनामूल्य औषधोपचार