Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : साडीला अंडी, टाचण्या, हळद-कुंकू लावून करणी; जीवे मारण्याची धमकी; देवऋषीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 13:48

Pune News : पुणे : राज्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार अनेक गुन्हे दाखल होत असतानाच एक खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. आईची साडी चोरुन साडीच्या बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबू, भेळ, भात, काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती, कापूर असे पदार्थ ठेवले. प्रॉपर्टीच्या कारणावरुन हा प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. यात सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनवाडी येथे ११ व १३ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी जनवाडी येथे राहणाऱ्या एका २८ वर्षांच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांता सुरेश चव्हाण (वय ७०), गिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघे रा. जनवाडी), संगीता सुपेकर (वय ४५), स्वप्निल सुपेकर (वय २३), सोनल प्रविण सुपेकर (वय ३०), देवऋषी स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) फिर्यादी व त्यांची आजी कांता चव्हाण या शेजारी शेजारी रहातात. फिर्यादीच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. सावत्र आई कोथरुडमध्ये राहते.

दरम्यान, फिर्यादीच्या आईची साडी घराबाहेर वाळत घातली होती. ही साडी चोरीला गेल्याचे कळले. सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर त्यांची आजी व तिच्याकडे भाड्याने राहणार्‍या मुलीनेच साडी चोरुल्याचे दिसले. १३ ऑगस्ट रोजी फिर्यादी हे शेजारील आजीच्या घरात गेले. (Pune News) त्यावेळी त्यांना धक्कादायक प्रकार दिसला. आई, मावशी, काकू यांचे फोटो ठेवून त्यांच्या फोटोला व आईच्या साडीच्या बाजूला अंडी, टाचण्या लावलेले लिंबू, भेळ, भात, काळीज, मटण, हळद-कुंकु, अगरबत्ती, कापूर असे पदार्थ ठेवले होते. तर देवऋर्षी मंत्रोच्चार करीत होते.

 

दरम्यान, फिर्यादीने माझ्या आईची साडी घेऊन काय करता, असे विचारले. तेव्हा आजी कांता चव्हाण हिने तुम्हाला भिकेला लावले, आमची प्रॉपर्टी घेतली. आम्ही तुमच्यावर करणी करुन तुम्हाला मारुन टाकणार, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबामध्ये भितीचे वातावरण आहे. (Pune News) पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : माणुसकीला काळीमा! सख्ख्या मोठ्या भावाकडून लैंगिक अत्याचार; बहिणीने दिला बाळाला जन्म

Pune News : ॐ नमस्ते गणपतये… श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Hadapsar News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - २ ची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.