Pune News : पुणे: आबासाहेब गरवारे महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय तलवारबाजी स्पर्धेत जीएच रायसोनी काॅलेज ऑफ इंजिनिरिंग आणि मॅनेजमेंट (जीएचआरसीईएम) च्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या द्वित्तीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी समर्थ वाटाणे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आगामी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) संघात निवड करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड
तसेच काॅलेजच्या फुटबॉल संघाने आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील 70 संघांचा सहभाग लक्षात घेता ही प्रशंसनीय कामगिरी आणखीनच प्रभावी आहे. उपांत्य फेरीत PCCOE निगडीने त्यांना 2-0 ने पराभूत केले असले, (Pune News) तरी त्यांची कामगिरी त्यांच्या खिलाडूवृत्तीचा आणि प्रतिभेचा पुरावा आहे. याव्यतिरिक्त, माहिती तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी वहाज शेख याने एआयएसएसएमएस कॉलेजच्या मैदानावर झालेल्या झोनल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून पुणे जिल्हा झोन फुटबॉल संघात स्थान मिळवले.
तसेच काॅलेजच्या, माहिती तंत्रज्ञान विद्याशाखेच्या तृत्तीय वर्षातील विद्यार्थी समाधान शिंदे याने खाशाबा जाधव क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत पोल व्हॉल्टमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. (Pune News) त्याची पुणे विद्यापीठाच्या ऍथलेटिक्स पोल व्हॉल्ट झोनल स्पर्धेत जीएचआरसीईएमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
जीएच रायसोनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी, जीएच रायसोनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी, (Pune News) जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर आणि क्रीडा संचालक डॉ. निशिगंधा पाटील यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मराठा आरक्षणासाठी; वृद्धापकाळात टोकाचे पाऊल..इंद्रायणी नदीत आढळला मृतदेह..!
Pune News : हिंजवडी येथील लक्ष्मी चौक ते कासारसाई रस्त्याने घेतला मोकळा श्वास
Pune News : म्हाळुंगे माण नगर योजनेला राज्य शासनाकडून मिळाली पर्यावरण परवानगी