Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. आता आणखी एक अशीच धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शिकवणी घेण्यासाठी घरी येणार्या शिक्षकानेच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एका गुरूनेच शिष्याशी असंबद्ध वर्तन केल्याने संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहे.
मुंढवा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने मुंढवा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अलोक (रा. घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) हा प्रकार घोरपडी येथे एप्रिल २०२३ मध्ये घडला होता.
संबंधित मुलीची शिकवणी घेण्यासाठी पालकांनी अलोक नावाचा होम ट्यूटर नेमला होता. हा ३५ ते ४० वर्षांचा शिक्षक फिर्यादीला शिकवण्यासाठी नेहमी घरी येत असे. (Pune News) दरम्यान, फिर्यादी या घरी एकट्या असताना त्याने गैरफायदा घेऊन मुलीशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास लहान भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने याची वाच्यता कुठेही नाही. वारंवार होणाऱ्या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर घडलेला प्रकार पालकांच्या लक्षात आला. (Pune News) त्यानंतर शिक्षकानेच अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सत्तार करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता ग्रामीण भागांतही धावणार लाइट मेट्रो?; वाहतूक कोंडींतून मुक्ती मिळणार!
Pune News : आम्ही घरातून काम करण्याची संधी देतो… म्हणत शिकवणी चालक महिलेची पाच लाखांची फसवणूक!