Pune News : पुणे : लाडक्या बाप्पांच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. राज्यभर बाप्पांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. गणेशोत्सव काळात पुण्यातील देखाव्यांचे आकर्षण अवघ्या राज्यभरातील गणेशभक्तांना असते. पुण्यातील पाच मानाच्या गणपती बाप्पांचे देखावे पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्याचप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा देखावा अवघ्या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर अयोध्येतील प्रभू राम मंदिराचा देखावा साकारणार आहे.
भाविकांच्या आकर्षणाचा ठरणार केंद्रबिंदू
दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळातर्फे भव्य-दिव्य देखावा साकारण्यात येतो. (Pune News) यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात प्रभू रामाची वानरसेना साकारण्यात येत आहे. या वानरसेनेने डोक्यावर दगड घेतले असून, त्यावर श्रीराम असे लिहिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या हस्ते या बाप्पाची पहिली आरती होणार आहे. (Pune News) तर या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर प्रभू श्री रामाच्या रामायणाची प्रतिकृती लावली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” स्पर्धा; आगीच्या घटना टाळणार
Pune News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय सुनेची विषारी औषध पिऊन आत्महत्या..