Pune News : पुणे : शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. शहर आणि उपनगरांत मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानही मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन ३ म्हणजेच पुणेरी मेट्रो पर्यावरणपूरक ठरणार आहे. यामध्ये असं तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे, ज्यामुळे मेट्रोचे ब्रेक दाबले की वीजनिर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ब्रेक दाबून तयार झालेली वीज मेट्रो चालवण्यासाठी वापरली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाला रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम म्हणून ओळखले जाते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत
संपूर्णपणे ‘ओव्हरेड’ असलेल्या २३.३ किलोमीटर अंतराच्या पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक अशा ‘रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’चा वापर होणार आहे. यामुळे ‘पुणेरी मेट्रो’ ब्रेक लावेल, त्यावेळी घर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून घेतली जाईल आणि त्यातून वीज निर्माण होईल. (Pune News) या ब्रेक दाबण्यातून निर्माण झालेल्या आणि साठवलेल्या वीजेचा वापर पुन्हा मेट्रो चलविण्यासाठी केला जाणार आहे. मेट्रो ट्रेनच्या बॅटरीजमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून देखील कार्य करते. ही एक ऊर्जा बचत प्रक्रिया असते; कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युत ऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते.
पुणे मेट्रो प्रवाशांना शहराच्या पर्यावरणाला पूरक अशी कामगिरी करणार आहे. या अंतर्गत मेट्रोच्या कामकाजामधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामध्ये नियंत्रण राखणे, ते कमी करण्याकडे भर दिला जाणार आहे. यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ऊर्जेची पुनर्निर्मिती किंवा फेरवापर करणे. (Pune News) हा फेरवापर शक्य करणारी अत्याधुनिक अशी ‘रीजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी’ पुणेरी मेट्रोमध्ये वापरण्याची योजना आहे, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली.
रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. या यंत्रणेचा वापर करून ज्यावेळी ट्रेन ब्रेक लावते, तेव्हा वीज निर्मिती होणार आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या तंत्रज्ञानामध्ये ट्रेन ब्रेक लावते तेव्हा गतीज ऊर्जा सोडते आणि ती मोटर्समधील विद्युतप्रवाहात साठवली जाते. (Pune News) मेट्रो ट्रेनच्या बॅटरीजमध्ये वितरित होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणून देखील कार्य करते. ही एक ऊर्जा बचत प्रक्रिया असते; कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युतऊर्जा त्याच ट्रेनला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊर्जेची बचत तर होणारच आहे शिवाय मेट्रो चालवण्याच्या खर्चात देखील बचत होईल असे सांगितले जात आहे.