Pune News : पुणे : उत्तम व्यायामासाठी सायकल चालवणे हा अत्यंत सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. पुणे शहरात वाढलेल्या प्रदूषणावर उपाय म्हणून अनेकजण पर्यावरणस्नेही सायकल प्रवास करतानाचे सुखद चित्र दिसते. अशाच एका पर्यावरणस्नेही पुणेकर आजींनी देखील प्रदूषणमुक्तीला हातभार लावण्यासाठी सायकल प्रवास करायचा ठरवला आहे. यासाठी त्यांना वयाची देखील पर्वा नाही. वयाच्या तब्बल ८० व्या वर्षी या आजी शहरातील गर्दीतून मस्त सायकल चालवतात. आजींच्या सायकल प्रवासाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायल होत असून पुणेकर आजींच्या सायकल प्रेमाचे अगदी भरभरून कौतुक करत आहेत.
आजींचा सायकल प्रवास समस्त तरुणाईसाठी मार्गदर्शक
देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी पुण्यात वाढली आहे. आता जवळपास प्रत्येक पुणेकरांकडे दोन गाड्या आहेत. परंतु सायकल मात्र नाही. आता अनेक घरांत फक्त मुलांसाठीच सायकली आहेत. (Pune News ) त्यामुळेच सायकलने प्रवास करणारा पुणेकर मिळणे अवघडच झाले आहे. पुणे शहरात सायकलस्वारांसाठी काही रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केला गेला. परंतु या ट्रॅकवर सायकली दिसत नाही. त्यामुळे गाड्यांची पार्किंग या ठिकाणी असते. या सर्व प्रकारात पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शहरातील ८० वर्षीय तरुण असलेल्या आजीबाईंचा हा व्हिडिओ आहे. ज्या रस्त्यांवर चालणे अवघड असते त्या रस्त्यांवर या आजीबाई साडी नेसून सायकलने प्रवास करत आहेत. (Pune News ) या व्हिडिओचे चित्रीकरण करताना आजीबाईंना तुम्ही किती वर्षांच्या तरुणी आहात? कुठे जाणार आहात? असे प्रश्न विचारताना दिसत आहेत.
१९८० ते ९० चे दशक सायकलींसाठी सुवर्णकाळ होता. पुणे शहर देखील सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. अनेक जण आठ, दहा किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलने करत होते. (Pune News ) आता वाहनांची संख्या वाढत गेली. यामुळे शहरातील प्रदूषणही वाढले. या पार्श्वभूमीवर ८० वर्षीय तरुण आजीबाईंचा सायकल प्रवास समस्त तरुणाईसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल
Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक
Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन… धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल