Pune News : पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले असून, या प्रकल्पाच्या उद्घाटनाची तारीख देखील ठरली आहे. चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पुण्यात बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी होणार उद्घाटन
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चांदणी चौकात सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास या नव्या प्रकल्पामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल ३९७ कोटी रुपयांचा आहे. (Pune News) मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. (Pune News) चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पुलाचे लोकार्पण झाल्यानंतर वाहतुकीत फरक जाणवेल का, याची उत्सुकता पुणेकरांना आहे.
समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेडराजाजवळ जुलै महिन्यात भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेचा न्यायवैद्यक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल समोर ठेवूनच शनिवारच्या बैठकीत उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Pune News) ही बैठक पाषाण येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीसाठी कराव्या लागणाऱ्या संभाव्य उपाययोजनांचे सादरीकरण करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ससून रुग्णालय लाच प्रकरणी मोठी अपडेट समोर; अधीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी!
Pune News : पुणे मेट्रो स्टेशन बांधकामावेळी कारच्या बोनेटवर लोखंड पडून भीषण अपघात
Pune News : भरधाव लॅम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; पुण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल