Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास गावाचा विकास शक्य; जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात पोपटराव पवार यांचे मत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 August 2023, 14:56

Shirur News : शिरूर : पाणी, शेती, भूविकास ही सेवा क्षेत्रे आहेत. एकेकाळी समृद्ध असलेल्या पंजाबला आता पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. गावांकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील नागरिक स्वास्थ्यपूर्ण जीवन जगू शकणार नाहीत, हे वास्तव आहे. खऱ्या अर्थाने गावांचा विकास साधायचा असेल, तर तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य आदर्श गाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

जे. आर. डी. टाटा हे खऱ्या अर्थाने महानायक

चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात पोपटराव पवार बोलत होते. (Shirur News) आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी शिरूर तालुक्यातील आदर्श ग्राम करंदीच्या सरपंच सोनाली किरण ढोकले यांना ‘ग्रामभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर तळेगाव-दाभाडे येथील आर. एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संस्थापक रामदास काकडे यांना ‘भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर रावी डिव्हायसेस इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र डोमाळे यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार रावेत येथील दीपक भोंडवे यांना ‘युवा कृषी उद्योगभूषण’ पुरस्कार, शिक्रापूर येथील हॉटेल गुडलक ॲण्ड ढाबाचे नीलेश रामाणे यांना ‘उद्योग विकास’ पुरस्कार आणि पिंपरी–चिंचवडमधील श्री सिद्धिविनायक वडापाव समूहाचे अमर लाड यांना ‘युवा उद्योजक’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

 

या वेळी पोपटराव पवार यांनी आदर्शगाव हिवरेबाजार येथे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिन ईटकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात,
आपल्या उत्पन्नातील खूप मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करणारा उद्योगसमूह अशी टाटा उद्योगसमूहाची ख्याती असल्याचे सांगून, भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे असे स्वप्न जे. आर. डी. टाटा यांनी शंभर वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यामुळे जे. आर. डी. टाटा हे खऱ्या अर्थाने महानायक होते, असे गौरवोद्गगार काढले.

वृक्षपूजन आणि तिरंग्याला वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. स्वागताध्यक्ष सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून, युवा पिढीला ऊर्जा मिळावी हाच पुरस्कारांचा उद्देश आहे, अशी भूमिका मांडली. (Shirur News) पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

मनोहर पारळकर म्हणाले की, पेशा म्हणून उद्योगाचा स्वीकार करणे हे अतिशय धाडसाचे काम आहे. खेडी स्वयंपूर्ण झाली तर माणसे शहराकडे धाव घेणार नाहीत, असे मत व्यक्त केले.

कार्क्रमाच्या संयोजनात अरुण गराडे, सुरेश कंक, जयवंत भोसले, धनंजय सोलंकर, वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर, प्रभाकर वाघोले, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी यांनी सहकार्य केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : आधुनिक काळात पोतराजाच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे; दुष्काळाचा परिणाम; आठवडे बाजारावर गुजराण

Shirur News : वढू बुद्रुक चौकात ट्रॅव्हलच्या धडकेत दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Shirur News : शिरूर तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात ; दुष्काळ जाहिर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Pune News : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीतून पुणेकरांना मिळणार मुक्ती; नव्या उड्डाणपुलाचे उद्या गडकरींच्या हस्ते उद्घाटन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.