Pune News : पुणे : जगातील सर्वांत उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट शिखरावर पुण्यातील दोन लेकरांच्या आईने यशस्वी चढाई केली आहे. आणि तिने नववारी साडी नेसून माउंट एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकाविला आहे. मराठमोळ्या महिलेने ही कामगिरी फत्ते करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. (Proud! A mother of two children from Pune hoisted the tricolor on Mount Everest in a Marathmoli Navari saree…!)
सुविधा कडलग यांचा विक्रम
बाणेर येथील गिर्यारोहक सुविधा कडलग असे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महिलेचे नाव आहे.‘दी अल्पायनिस्ट’या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सुविधा कडलग, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे हे सहभागी झाले होते. (Pune News ) त्याचा प्रवास पुणे ते दिल्लीमार्गे काठमांडू ते रामशाप असा ८ एप्रिल रोजी सुरु झाला.
सुविधा कडलग यांनी १७ मे रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. आणि अथक परिश्रमाने अतिउच्च माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. या मोहिमेतून त्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. शिखर सर केल्यानंतर त्या ठिकाणी कडलग यांनी नववारी साडी नेसून हाती भगवा झेंडा व तिरंगा उंचावत जल्लोष केला. (Pune News )
याबाबत बोलताना सुविधा कडलग म्हणाल्या की, उणे २० अंश सेल्सिअस तापमानात प्रचंड थंडी, रात्रीच्या प्रहरी चढाई, अशा कठीण परिस्थितीत सकारात्मक विचारांची साथ हे शिखर सर करण्यासाठी अधिक बळकटी देणारी ठरली. (Pune News ) शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरून परतताना पाय घसरला. मात्र, मी सुदैवाने वाचले. एव्हरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर ऊर्जा देणारी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Pune News : अखेर सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बस लवकरच सुरु…! शिवशाहीप्रमाणेच तिकीट दर
Pune News : जनता वसाहतीत टोळक्याने तरुणावर केले शस्त्राने वार