Pune News पुणे : विद्यापीठ प्रशासनाने नियमीत विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या निषेर्धात विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज शनिवारी (ता.८) आंदोलन केले आहे. (Pune News)
अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न आले. या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाच्या आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपर पुन्हा घेऊ नये अशी मागणी केली आहे.