Pune News : पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले असून, घटनेचे पडसाद पुणे शहरात उमटू नयेत म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मराठा समाजाची माफी मागावी
या वेळी बोलताना राजेंद्र कुंजीर म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने ५३ मोर्चे काढण्यात आले होते. (Pune News) या मोर्चांची दखल जगाने घेतली. पण आपल्या येथील राज्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तमाम मराठा समाजाची माफी मागावी आणि संबधित पोलीस अधिकार्यांवर करावी, अशी आमची मागणी आहे. (Pune News) अन्यथा आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा या वेळी त्यांनी राज्य सरकारला दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कोरियात नृत्य शिकण्याच्या इच्छेपायी विश्रांतवाडीतील दोन मुलींचा घरातून पोबारा
Pune News : निरक्षरांच्या सर्वेक्षणावर माध्यमिक शाळांतील शिक्षकांचाही बहिष्कार…
Pune News : निवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे अल्प आजाराने निधन