Pune News : पुणे : पुण्यातील बुधवार पेठ हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. येथून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुधवार पेठेत अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या १० बांगलादेशी महिला आणि ९ पुरूष अशा एकूण १९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये १० बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत होत्या. तर ९ पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली.
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कामगिरी
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बुधवार पेठतील वेश्या गल्लीतील कुंटनखान्यात बांगलादेशातून विनापरवाना महिला आणि पुरूष वास्तव्य करीत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला १ ऑगस्ट रोजी मिळाली होती. (Pune News ) या नागरिकांकडे कोणतेही वैध कागदपत्र नाहीत. तसेच भारत बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून १० मुली आणि ९ पुरुष यांनी भारतात अनधिकृत प्रवेश केल्याचे समजले. सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यांना अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता, अटक करण्यात आलेले नागरिक बुधवार पेठ परिसरात गेल्या ३ महिन्यांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. (v) गुरूवारी रात्री छापा टाकून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३ सह ६, परकीय नागरिक आदेश १९४८ चा नियम ३ (१) सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (v) तसेच पुढील कारवाईसाठी आरोपींना फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.