Pune news : पुणे : गणेशोत्सव मिरवणूक म्हटली की लोकगीतांचा तडका हा असतोच. सध्या अनेक लोकगीते डिजेवर वाजविली जातात. इतर शोमध्येही अनेक लोकगीते सादर केली जातात. या वर्षीच्या गणेशोत्सव मिरवणुकीला सुप्रसिद्ध गीतकार “पप्पी दे पारुला फेम” हरीदास कड ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’, हे नवीन लोकगीत घेऊन आले आहेत. या लोकगीताला अनेकांनी पसंती दर्शविली आहे.
डिजेवर थिरकतायत तरुणाईची पावले!
सध्या गणेशोत्सवात लोकगीतांना अधिक पसंती दिसत आहे. तरुण डिजेवर या नव्या लोकगीताची फर्माईश करत आहेत आणि त्यावर तरुणांची पावले थिरकत आहेत. (Pune news ) सध्या “पोरी तुझा पाहून गं टॅटू” या गाताची तरुणांमध्ये क्रेझ आहे. हे गीत सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी लिहिले असून, प्रसिद्ध गायक अक्षय गरडकर यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत योगेश भवाळ यांनी दिले आहे. युट्यूबवर हे गाणे रिलीज झालेले आहे. या गाण्याबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, नितीन कुमार बनसोडे, नृत्य दिग्दर्शक महेंद्र बनसोडे व इतरांनी ‘पोरी तुझा पाहून गं टॅटू’ हे गाणं उत्कृष्ट असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Pune news ) या गाण्याला सर्वांची नक्कीच मागणी असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या गीताविषयी बोलताना सुप्रसिद्ध गीतकार हरिदास कड यांनी सांगितले की, हे गाणे वास्तवावर आधारलेले आहे. या गाण्याबाबत अनेकांनी चांगल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. (Pune news ) अनेक मान्यवरांनी, ‘हे गाणे उत्कृष्ट असून, अल्पावधीत लोकप्रिय होईल’, असे सांगितले आहे. स्टेज शोला तसेच डीजेवर या गाण्याला प्रचंड मागणी राहील, असे अनेकांचे म्हणणे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नाणेघाटात पर्यटनासाठी आलेल्या बडोद्यातील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू
Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता ‘समूह शाळेत’ होणार
Pune News : वाबळेवाडी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक वारे गुरूजी अखेर दोषमुक्त! चौकशी समितीचा अहवाल