Pune News: पुरंदर तालुक्यात अनधिकृत प्लॉटिंगची विक्रीत वाढली आहे. याच दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने धडक कारवाई केली आहे. मागीतल दोन दिवसांता तीन गावांमध्ये कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या मोहिमेमुळे PMRDA हद्दीतील बेकायदेशीर प्लॉटिंगला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. ही मोहीम सोमवारी दि. २४ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिली. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत प्लॉटिंगमुळे नागरिकांची फसवणूकीचे तक्रार येत होते. त्यामुळे PMRDA कारवाई करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले. या तक्रारींचे गांभीर्य घेत PMRDAने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. पुरंदर तालुक्यातील 15 गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, 19 नोव्हेंबर पासून कारवाईचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.
पुरंदर येथील मौजे देवडी गट क्र. १७०, शंकर बाठे, मौजे आंबोडी गट क्र. १५९, निखिल बोरकर व यशोदीप बोरकर, मौजे काळेवाडी गट क्र. १७०६, गुलाब झेंडे / कातोबा डेव्हलपर्स (गणेश पार्क) मधील प्लॉटिंग, अंतर्गत रस्ता व डिमार्केशन पोल यावर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही कारवाई करण्यात आली.






