Pune News : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. शिरूर मतदारसंघात अजित पवार यांच्या येण्यामुळे कमळ फुलणार, की राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचाच प्रभाव राहणार, अशी चर्चा होत असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना २०१९ च्या निवडणुकीत मावळमधून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. आता अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय स्थिती बदलली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी अजित पवार यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. (Pune News ) त्यातच मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. त्याचवेळी पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवारांच्या सत्तेत येण्यामुळे शिंदे गटाची समीकरणे बदलत आहेत. राष्ट्रवादी आमच्या महायुतीत असली तरी २०२४ लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असणार, असं म्हणत श्रीरंग बारणेंनी आताच उमेदवारीवर दावा ठोकला आहे. (Pune News ) आता या मतदारसंघात श्रीरंग बारणेंना संधी मिळणार, की पार्थ पवारांना संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, बारणे यांच्या मते, मावळातील उमेदवारीबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून, त्याच्यामध्ये कोणातही बदल होईल असे वाटत नाही. (Pune News ) आपणच मावळ लोकसभेचा उमेदवार असल्याचा दावा बारणे यांनी केला आहे. पार्थ पवार यांना अजित पवार निवडणुकीसाठी कुठून उमेदवारी देतात हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी मावळ लोकसभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! यंदा ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपी वापरास परवानगी…!