Pune News : पुणे : वडील हे मुलीचे पहिले मित्र, संरक्षक आणि सूपरहीरो असतात. मात्र, याच नात्याने विश्वासघात केल्यास नात्यांवरचा विश्वास उडतो. मुलगी घरातही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होते. नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना नुकतीच कात्रज परिसरात घडली आहे. मुलगी शाळेत जाण्यासाठी गणवेशाला इस्त्री करत होती. या वेळी मुलीला बापानेच बॅड टच केला. त्याला मुलीने विरोध करताच, बापाने गरम इस्त्रीचा चटका दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून ४३ वर्षीय नराधम बापाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी शालेय शिक्षण घेते. २ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ती शाळेत जाण्याची तयारी करत होती. (Pune News ) त्यासाठी शाळेच्या गणवेशाला इस्त्री करत असताना, पाठीमागून आलेल्या बापाने तिला बॅड टच केला. मुलीने याचा जाब विचारताच, बापाने शिवीगाळ करत तिच्या दप्तरातील पुस्तके फाडून टाकली. यानंतर त्याने पुन्हा बॅड टच केला असता, मुलीने बापाला दूर लोटले.
मुलीच्या कृत्याचा राग अनावर झाल्याने बापाने मुलीच्या गालावर गरम इस्त्रीचा चटका देत तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थले करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तब्बल पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त