Pune News : पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या खिशातील रोकड, महिलांच्या गळ्यातील दागिने, सोनसाखळी चोरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. आता गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर्षी अनेकांचे मोबाइल संच चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाल्या आहेत. यंदा गणेशोत्सवात मोबाइल चोरीला गेल्याच्या एक हजारहून जास्त तक्रारी पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलवर करण्यात आल्या आहेत.
झारखंडमधील चोरट्यांकडून ५० मोबाईल जप्त
यंदा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यासह टिळक रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता या विसर्जन मार्गावर गुरुवारी रात्री झालेल्या गर्दीत चोरट्यांनी मोबाइल चोरल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या. (Pune News) गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाइल संच चोरट्यांनी चोरले.
विश्रामबाग, खडक, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल चोरीला गेल्याच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या झारखंडमधील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. (Pune News) त्यांच्याकडून ५० मोबाइल संच जप्त करण्यात आले. पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन पोर्टलवर देखील तक्रार करण्यात आली .
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : …बायको माहेरी गेल्यासारखे नाचू नका; बॅनरने वेधले पुणेकरांचे लक्ष!
Pune News : मिरवणूक मार्गावर ७५० किलो रंग अन् १२५० किलो रांगोळीच्या पायघड्या