Pune News : पुणे : त्वचेवर उपचार करण्याच्या बहाण्याने बांगलादेशातून काही तरुणींना पुण्यात बोलावून त्यांना कुंटणखान्यात बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने हे प्रकरण उघड केले असून, या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
सात जणांना अटक
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणींना तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर भारतात चांगली ट्रिटमेंट होईल. तुम्ही पुण्यात या, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या विमानाने पुणे शहरात आल्या. परंतु त्यानंतर त्यांच्यासोबत भयंकर घडले. त्यांना कुंटणखान्यात बसवण्यात आले. (Pune News) याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. या विभागाने बुधवार पेठेत सात बांगलादेशी महिलांना अटक केली. अधिक तपास केला असता, पोलिसांना महिलांकडून धक्कादायक माहिती मिळाली. या तरुणींची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यातून हा फसवणुकीचा प्रकार घडला होता.
सलग तिसऱ्यांदा पुणे पोलिसांनी बांगलादेशी महिलांवर कारवाई केली आहे. या कारवाईच्या वेळी सात जणांना अटक केली. त्या बांगलादेशी महिलांकडे भारतात येण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. पुणे पोलिसांनी सातत्याने कारवाई केल्यास घुसखोरांवर प्रतिबंध बसणार आहे. (Pune News) पोलिसांनी संपूर्ण शहरात घुसखोरांविरोधात मोहीम सुरु केली तर अनेक घुसखोर सापडणार आहेत, अशी चर्चा हेत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुंढवा, हडपसरमधील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेची १७० कोटींची निविदा
Pune News : धक्कादायक! पुण्यातील मुक्तांगण शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार