Pune News पुणे, ता. २९ : तेल कंपन्यांकडून सन २०१७ सालापासून पेट्रोल आणि डिझेलच्या डीलर मार्जिन दिला नाही. त्यामुळे तब्बल ६ वर्षापासून प्रलंबित असलेले मार्जिन त्वरित जारी करावे. अशी मागणी पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे. (Pune News)
पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट
पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी आज शनिवारी (ता.२९) खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशनने वरील मागणी बारणे यांच्याकडे केली आहे. यावेळी अध्यक्ष ध्रुव रुपारेल, शिवराज शितोळे, सोनू नागपाल, कालिदास मोरे, धनंजय शितोळे, काका झांबरे, भूषण देसाई, संदीप साखरे, श्रीमती सुजाता शहा, अमर रेणुसे, आबा वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Pune News)
सन २०१७ पासून तेल कंपन्यांकडून प्रलंबित असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या डीलर मार्जिनबद्दल पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे चिंता व्यक्त केल्या. तसेच आता ६ वर्षांहून अधिक काळ मार्जिन जारी न केल्यामुळे डीलर्सचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच असोसिएशनच्या समस्या योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. अशी मागणी असोसिएशनने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, अपूर्व चंद्र समितीने २०१३ मध्ये असोसिएशनच्या डीलर मार्जिनसाठी एक अहवाल तयार केला होता. आणि मंत्रालय आणि तेल कंपन्यांना सल्ला दिला होता की डीलर्सना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक लक्षात घेऊन सुधारित पेट्रोल आणि डिझेल मार्जिन द्यावे. आणि सुधारित मार्जिनसह दर सहा महिन्यांनी पैसे द्यावे. असे अपूर्व चंद्र समितीने अहवालात सांगितले होते.
याबाबत बोलताना पुण्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले कि, असोसिएशनच्या डीलरला २०१७ नंतर एक पैसाही दिला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आणि इतर खर्च जसे की वीज, बँकेचे व्याज दर आणि आमच्या व्यापाराशी संबंधित सर्व खर्च वाढले आहेत. पण तरीही आमचे मार्जिन २०१७ पासून राहिले आहे. तेल कंपन्यांनी प्रलंबित डीलर मार्जिन त्वरित द्यावे.