Pune News : पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकवत असताना हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचे उदाहरण देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी संतप्त हिंदूनी प्राध्यापकांना गाठून पोलीस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.
शिक्षण संस्थेने कामावरून काढून टाकले
आक्षेपार्ह विधान करणारे हे प्राध्यापक सिम्बॉयसीस कॉलेजमध्ये आहेत. हिंदू धर्मातील देवांबाबात त्यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Pune News ) हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण सांगितले आणि व्हिडीओ देखील दाखवला. मात्र, १२ तास उलटून गेल्यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नाही.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिम्बॉयसीस कॉलेजच्या या प्राध्यापकाने बारावीच्या वर्गात शिकवताना हिंदू देवदेवतांसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप हिंदू बांधव सामाजिक संस्थेने केला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाला या हिंदू कार्यकर्त्यांनी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढत असल्याचा दावा हिंदू बांधव समाजिक संस्थेने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्राध्यापकांना समज देऊन सोडून दिले आहे. (Pune News ) मात्र, या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
दरम्यान, हे प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच संबंधित शिक्षण संस्थेने वादग्रस्त विधान करणाऱ्या प्राध्यापकाला कामावरून काढून टाकले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दारु पिताना टोकाचे वाद; मामाच्या डोक्यात गज घालून भाच्याने केला निघृण खून!
Pune News : भरधाव कंटेनरच्या धडकेत ११ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू