Pune News : पुणे : गणरायाच्या आगमनाची उत्सुकता देसभरातील भाविकांना असते. बाप्पांवरील श्रद्धेपोटी भारताच्या सीमावर्ती भागांमधील अरुणाचल प्रदेश, पंजाबसह अन्य ठिकाणी मराठा बटालियनचे सैनिक मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करतात. गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दगडूशेठ बाप्पांच्या सहा मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी ही माहिती दिली.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली माहिती
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदा लष्कराच्या ३३, १९, १, ५ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी विविध सीमावर्ती भागांत दगडूशेठच्या ‘श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती.(Pune News ) या पार्श्वभूमीवर ट्रस्टने दोन फूट उंचीच्या मूर्ती बटालियनला दिल्या आहेत. या वेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
बाप्पांप्रती भक्तीभाव व्यक्त करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागांत केली जाते. (Pune News ) यंदा ट्रस्टतर्फे सहा मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला दिल्या आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची जुनी परंपरा आहे. यामुळे मराठा बटालियनच्या सैनिकांना एक सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याची भावना जवानांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद
Pune News : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा..