Pune News : पुणे : ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. घराचा व्यवहार केल्यानंतर घराचा ताबा न देता एका ६५ वर्षीय महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील टिंगरे नगर परिसरात नुकताच घडला आहे. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिंगरे नगर परिसरातील घटना
याप्रकरणी किवळे देहूरोड येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विकास वाघमारे (वय ३०, रा. निगडी, तळवडे), गुड्डू शेख (वय ४०, रा. वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार गंगोत्री अपार्टमेंट, टिंगरे नगर रोड येथे जून २०११ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडला आहे. (Pune News ) आरोपींनी फिर्यादींना जून २०११ मध्ये फ्लॅटची विक्री केली. फिर्यादीनी फ्लॅटचा व्यवहार झाल्यानंतर आरोपींना १५ लाख रुपये दिले.
दरम्यान, महिलेकडून पैसे घेतल्यानंतर देखील आरोपींनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच महिलेला नवीन घर घेऊन देतो असे सांगून अद्याप घर दिलेले नाही. फिर्यादी महिलेने आरोपींना दिलेले पैसेही परत केले नाहीत. घराबाबत विचारणा केली असता दोघांनी टाळाटाळ केली. (Pune News ) एकंदर प्रकारातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची चौकशी करुन दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर