Pune News : पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी तडीपार गुंडाला वानवडी तपास पथकाने मोठ्या शिफातीने बेड्या ठोकत या प्रकरणाचा छडा लावला आहे.
श्रीधर ऊर्फ सोन्या विठ्ठल शेलार (वय ३५ वर्षे, रा. शांतीनगर, स.नं. ५४/९ब वानवडी, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी भागात वास्तव्यास असणारे (Pune News) राष्ट्रवादी पक्षाचे पुणे शहरध्याक्ष प्रशांत जगताप यांचे भावाला तडीपार आरोपीत सोन्या शेलार यांने गोळया घालुन उडवून देण्याची फोनवरून धमकी दिली होती. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी सोन्या हा शिंदे छत्री, नुराणी कब्रस्थानकडे जाणारे रोडवर, (Pune News) वानवडी या परिसरात दारूच्या नशेत धारदार हत्यारासह फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदार मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक ! पहिल्याच दिवशी फी साठी विद्यार्थ्यांना हाकलले शाळेबाहेर