Pune news : पुणे : सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा शासन निर्णय रद्द करावा, तसेच भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या दोन प्रमुख मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या विरोधात समितीने आंदोलनाची हाक दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने सकाळी १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. सरकारी नोकरीचे स्वप्न संपवणे म्हणजे कंत्राटीकरण…, किमान वेतन संपवणे म्हणजे कंत्राटीकरण…, नोकऱ्यांमधील आरक्षण संपवणे म्हणजे कंत्राटीकरण…, अशा पद्धातीचे पोस्टर हातात घेवून या वेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. विद्यार्थी म्हणाले की, राज्यातील लाखो विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. परंतु, सरकाराने अचानकपणे कंत्राटी भरतीचा निर्णय घेतला आहे. खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. (Pune news) एकीकडे आरक्षणासाठी लोक आंदलने करत आहेत, त्यांना आरक्षण देण्याची आश्वासनेही दिली जात आहेत. तर दुसरीकडे तुम्ही कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहात. आमदार-खासदारांच्या कंपनीला कंत्राट दिले जात आहे. भविष्यात आमदार-खासदारच हे चक्र चालवणार आहेत का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
सरकाराने काढलेला कंत्राटी पद्धतीचा जीआर रद्द करून, सर्व पदे एमपीएससीमार्फत भरावी, अशी आमची मागणी आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गुगलवर रिव्ह्यू द्या, पैसे मिळवा; ‘ऑनलाइन टास्क’ देवून ३५ लाखांना लुटले