Pune News : पुणे : ससून हे गंभीर आजारांवरील उपचाराचे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. सरकारी रुग्णालय असल्याने येथे गंभीर आजारच नव्हे, तर किरकोळ आजाराचे रुग्ण देखील येतात. केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यातील इतर भागांतून रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयावरील ताण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी अचानक ससून रुग्णालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही देखील दिली.
रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही
ससून रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज अडीच ते तीन हजार रुग्ण उपचारासाठी येतात. मनुष्यबळ अपुरे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येतो, याशिवाय आर्थिक नियोजन देखील कोलमडते, ही बाब नित्याचीच झाली आहे. (Pune News ) येथील रूग्णालय प्रशासनाने ही बाब मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
या वेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील पदे लवकरात लवकर भरली जातील याकडे मी कटाक्षाने लक्ष ठेवणार आहे. (Pune News ) अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथील एम्स रूग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयामध्येही दर्जेदार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा-सुविधा मिळतील, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.
या आढावा बैठकीत आरोग्य संचालक डॉ. अजय चंदनवाले, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती किणीकर, अधीक्षक डॉ. सुनील भामरे यांच्यासह रुग्णालय व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते. (Pune News ) बैठकीआधी मंत्री मुश्रीफ यांनी हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागासह सर्वच विभागांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली. बालरुग्ण विभागाच्या नवजात बालकांसाठीच्या मानवी दूध पेढीचेही त्यांनी कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मुंढव्यात ४६ लाखांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त; एका महिलेसह तिघांना अटक
Pune News : स्वच्छतेत पुणे स्थानक अनुत्तीर्ण; स्वारगेट, शिवाजीनगर काठावर पास