Pune News : पुणे : मराठा आंदोलनाची धग ‘वर्ल्डकप’मध्येही पाहिला मिळत आहे. पुण्यात श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. मात्र, जे प्रेक्षक काळे कपडे परिधान करून आले होते. अशा प्रेक्षकांना पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी बाहेरच अडवलं. इतकेच नाहीतर त्यांना हे कपडे घालून जाता येणार असंच एकप्रकारे सांगण्यात आले.
काळे कपडे घालून आलेल्या क्रिकेटप्रेमींना आत जाण्यास मज्जाव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. त्याला हजारो मराठा बांधवांकडून पाठिंबाही दिला जात आहे. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यात उमटू नयेत. याची पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. (Pune News) त्याच पार्श्वभूमीवर कोणी काळे कपडे दाखवून याचा निषेध करू नये. म्हणून अनेक क्रिकेटप्रेमी जे काळे कपडे घालून आले होते त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला.
दरम्यान, अशाप्रकारे अचानक काळ्या कपड्यांना बंदी घातल्याने आणि यंत्रणांनी पूर्वकल्पना न दिल्यानं प्रेक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. (Pune News) पुण्यात यानंतर आणखी तीन सामने होणार आहेत, मराठा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही. तर त्यावेळी प्रेक्षकांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आता गुगल मॅपवरही देशाच्या नावात बदल; सर्च केल्यावर तिरंग्यासोबत दिसते ‘भारत’
Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी