Pune News : पुणे : वेगात विकसित होणाऱ्या महत्वाच्या शहरांपैकी पुणे हे शहर आहे. एकेकाळी सुसंस्कृत, सुरक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणून पालक मुलींना मुंबई, नागपूरला पाठवण्याऐवजी पुण्याला पाठवणं योग्य समजत असत. पण आता चित्र बदललं आहे. दिवसागणिक पुण्यातील गुन्हेगारी वाढते आहे. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळ धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारखे अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. यामुळे पुणे पोलीस आक्रमक झाले आहेत. शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. दहशत माजवणाऱ्या टोळींची धिंड काढली जात आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत बसत आहे. शहरातील विमाननगर भागात दहशत माजविणाऱ्या टोळीवर पोलिसांनी सर्वांत मोठी कारवाई केली आहे. या टोळीवर पोलिसांनी मकोका लावला आहे.
प्रसाद गायकवाड टोळीवर कारवाई
अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर असलेली विमाननगर परिसरातील प्रसाद गायकवाड यांची गुंड टोळी सक्रीय आहे. या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. (Pune News ) या टोळीमधील प्रसाद संपत गायकवाड (वय २५, वडगाव शेरी, पुणे), अरबाज अयुब पटेल (वय २४ येरवडा, पुणे), बबलू संतोष गायकवाड (वय २२, विमाननगर, पुणे) यांना मकोका लावला आहे. रितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ५२ गुंड टोळ्यांविरुद्ध मकोका लावला आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे पीआय विलास सोंडे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यांनी दिलेल्या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर मकोकाची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिले. (Pune News ) आरोपींवर यापुढेही धडक कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, प्रसाद गायकवाड यांच्या टोळीतील आरोपींनी विमाननगर भागात एका विक्रेत्याला धमकावून लुटले होते. पोलिसांच्या रेकॉर्डवर त्यांच्यावर दरोडा, तोडफोड, दहशत माजवणे, शस्त्रे बाळगणे हे गुन्हे दाखल आहेत. आता थेट मकोका लावण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : वरंध घाट २५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला
Pune News : हडपसर येथे ट्रकचे स्टेअरिंग तुटून, दुभाजकाला धडक; केबिनचा चक्काचूर