Pune News : पुणे : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात शहरात मोठमोठे देखावे साकारले जातात. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आता गणेशोत्सव काळात शहरासह जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीची सर्व दुकाने १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ नुसार किरकोळ मद्यविक्रीची सर्व सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Pune News) १९ आणि २८ सप्टेंबर असे दोन्ही दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील तर २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसेच ज्या भागात पाचव्या, सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागातील दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असतील, (Pune News) त्या-त्या ठिकाणी मिरवणूक मार्गावरील सर्व भागांतील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मद्यविक्री परवानाधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही नमूद केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा..
Pune news : रिंगरोडसाठी पश्चिम भागात ७०० हेक्टर जमिन संपादनाची गरज; मात्र, संमतीमध्ये अडथळे