Pune News : पुणे : राज्यातील अनेक भागांत अद्यापही पाऊस झाला नाही. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. राज्यात जोरदार पाऊस पडू दे. पाऊस झाल्यावर बळीराजा सुखावेल. राज्यातील कायदा सुव्यवस्था देखील उत्तम राहू दे… अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपतीसमोर केली.
शहरातील प्रमुख गणेश मंडळांना दिली भेट
बाप्पांचे आगमन होऊन सात दिवस झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराच्या कायदा-सुव्यवस्थेची माहिती घेतली. (Pune News) तसेच मानाच्या पहिल्य कसबा गणपतीचे दर्शन घेतले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शहरातील अन्य प्रमुख मंडळांना भेट दिली.
या वेळी माध्यमांशी संवाद साधताना एका पत्रकाराने अजितदादांना प्रश्न विचारला की, तुम्ही गणरायाकडे काय मागणे मागितले? यावर अजित पवार यांनी या प्रश्नाला मिश्किलपणे उत्तर दिले. ते म्हणाले की, तुला संपादक कर, अशी प्रार्थना मी गणरायाकडे केली. (Pune News) दादांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत अद्यापही पाऊस झाला नाही, त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस पडू दे. पाऊस झाल्यावर बळीराजा सुखी झाला की वातावरण बदलून जाते. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहू दे, हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मद्य पाजून तरुणीवर क्लिनीकमध्ये बलात्कार; डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : शिरूर हवेलीसह जिल्ह्यातील १० मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर
Pune News : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीला साडीने आवळला गळा; नराधम पतीवर गुन्हा दाखल