Pune News : पुणे : परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास होणाऱ्या कारवाई विषयी परिपत्रक जारी केले आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना 25 हजार रूपये दंड केला जाणार आहे तर, अल्पवयीन मुलांना 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवानाही मिळणार नाही. (Pune News ) याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, यासाठी कारवाईच्या सूचना परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिवहन आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केले आहे.
होणार कायदेशीर कारवाई
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरूंगवास होऊ शकतो. (Pune News ) हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर 25 हजार रूपये दंडाची ही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची 25 वर्षे पूर्ण होईपर्यंचा वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही.
केवळ हीच वाहने चालविण्यास 16 ते 18 वयाच्या मुलांना परवानगी
18 वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही. याला केवळ 50 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींचा अपवाद आहे. या दुचाकी 16 वर्षांवरील सर्वांना चालविण्यास परवानगी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात पाचशे रुपयांसाठी हातात तलवार घेवून घरात शिरून शिवीगाळ ..
Pune News : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ! अरण्येश्वर भागात दहशत, वाहनांची तोडफोड