Pune News : पुणे : ससून रूग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा नाशिक जिल्ह्यातील ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्या अटकेनंतर अनंक बाबींचे धक्कादायक खुलासे होत आहेत. तीन मोठ्या शहरांतील पोलीस या प्रकरणात महत्त्वाची माहिती गोळा करत आहेत. आता या प्रकरणात नाशिकमधील माजी महापौराचे नाव जोडले गेले आहे. ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्ती करण्यासाठी महापौर विनायक पांडे याच्या चालकाने त्याला मदत केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती ठाकरे गटाची असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपच्या दादा भुसे यांचे नाव घेतले जात असतानाच, ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
माजी महापौर अडचणीत येण्याची शक्यता
माजी महापौर असलेले विनायक पांडे हे ठाकरे गटाचे नेते आहेत. (Pune News) ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्ती करण्यासाठी महापौर विनायक पांडे यांच्या चालकाने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या प्रकरणात पांडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून भाजपच्या दादा भुसे यांचे नाव घेतले जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव चौकशीत समोर आले आहे. विनायक पांडे यांनी याप्रकरणी ठाम पवित्रआ घेतला आहे. मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे त्यांचे मत आहे.(Pune News) माझा राजकीय प्रवास संपविण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र असल्याचा आरोप पांडे करत आहेत. यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापत आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव चर्चेत आल्यामुळे शिंदे गट आक्रमक होत आहे. दादा भुसे यांनीच ललित पाटील याला शिवसेनेत आणल्याचा आरोप संजय राऊत करत होते. (Pune News) परंतु आता ठाकरे गटाचे नेतेच अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वारगेट परिसरात रिक्षा चालकांकडून तरुणाचा खून ; चारही रिक्षा चालकांना अटक..
Pune News : नीरा ते लोणंद रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण; आता रेल्वे धावणार सुसाट