Pune News : पुणे : इस्लामपुर येथील वैद्यमापक शास्त्राचे निरीक्षक यांच्याकडे दरमहा ३१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथील वैद्यमापन शास्त्राचे सहनियंत्रक ललित हारोळे यांना सोमवारी (ता.३१) रंगेहाथ पकडले आहे.
डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय-५५, सह नियंत्रक, वैद्यमापन शास्त्र, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी एका ५४ वर्षीय वैद्यमापक शास्त्राचे निरीक्षक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
आपल्याच खात्याच्या अधिका-याकडे मागितली होती लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वैद्यमापक शास्त्र इस्लामपुर येथे निरीक्षिक म्हणून नेमणुकीस असून, त्यांच्याकडे इस्लामपुर विभाग, कराड १, कराड-२ सातारा -२ अशा तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. (Pune News) तर आरोपी लोकसेवक डॉ. ललित हारोळे हे त्यांचे विभागीय प्रमुख आहेत.
दरम्यान, लोकसेवक आरोपी डॉ. ललित हारोळे यांनी तक्रारदार यांच्या विभागाच्या हद्दीत होणारी पडताळणी व मुद्रांकनाच्याबद्दल प्रत्येक निरीक्षक विभागाप्रमाणे दरमहा ४ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. असे चार विभागासाठी १६ हजार व कराड – १ विभागाच्या कार्यक्षेत्रातील डायमंड शुगर वर्क कंपनीच्या स्टोर कैलीब्रेशनच्या तीन टैंकसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे १५ हजार अशी एकूण ३१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.(Pune News) याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा येथील पुणे विभागाच्या वैद्यमापन शास्त्र कार्यालयात सोमवारी (ता.३१) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ३१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी लोकसेवक डॉ. ललित हारोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पंतप्रधानांचा पुणे दौरा; हे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद!
Pune News : अखेर त्यांचं ठरलं; पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थिती लावणार