Pune News : पुणे : हिंजवडी येथील लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ति चौक, मारुंजी येथील रस्त्याच्या हद्दीमधील अतिक्रमणे व अनाधिकृत बांधकाम यांचे सुमारे ७५०० स्क्वेअर फुट निष्कासन कारवाई शुक्रवारी (ता.२७) करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्याने हिंजवडीकरांनी मोकळा श्वास घेतला आहे.
वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार
या रस्त्यावरील अतिक्रमनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या कारवाईमुळे सदर मार्ग वरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Pune News) कारवाईच्या वेळी पीएमआरडीए चे अधिकारी कर्मचारी तसेच वाहतूक व पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हि कारवाई पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वाहतूक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत संयुक्तिकपणे करण्यात आली.
दरम्यान, रस्त्याला अडथळा करणारे लक्ष्मी चौक ते कासारसाई वरील अतिक्रमण तसेच मौजे मान ते मानदेवी मंदिरा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे नियोजन असून याद्वारे रस्त्यामध्ये अतिक्रमण करणारे सर्व बांधकामे काढून घ्यावेत. (Pune News) असे आवाहन PMRDAच्या सहआयुक्त मोनिका सिंह यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी तब्बल १५ मोबाईल चोरले ; भिवरीतील दोघांना अटक
Pune News : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी तरुणाचा जागीच मृत्यू;