Pune News : पुणे : अवघ्या १० रुपयांत हॉटेलमधील रुम बुकींग करून देतो, असे सांगत सायबर गुन्हेगारांनी दिल्लीतील व्यावसायिकाला तब्बल दोनदा ओटीपी शेअर करण्यास सांगितला. कमी खर्चात चांगली रूम मिळेल या भाबड्या आशेने त्याने ओटीपी शेअर केला. या घटनेनंतर काही वेळातच संबंधित व्यावसायिकाचे लाखो रुपये खात्यातून गेल्याचे लक्षात आले आणि त्याने अक्षरशः डोक्याला हात लावला. दिल्लीतील एका ४० वर्षांच्या व्यावसायिकाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे दिल्ली येथील व्यावसायिक असून, डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दर महिन्याला दोन वेळा व्यवसायानिमित्त येतात. यावेळी त्यांचा पाच दिवस पुण्यात मुक्काम असतो. (Pune News) दरम्यान, नेहमीच्या सवयीप्रमाणे ते पिंपरी येथील हॉटेल हॉलिडेमध्ये उतरले होते. येथे त्यांना केवळ दोन दिवसांसाठी रुम मिळाली होती. त्यामुळे पुढील मुक्कामासाठी कल्याणीनगर येथील हॉटेल रॉयल ऑर्केटच्या वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकावर त्यांनी रुम बुकिंगबाबत चौकशी केली.
दरम्यान, ते पिंपरी येथे या बैठकीमध्ये असताना त्यांना कॉल आला. तो नंबर हॉटेल रॉयल ऑर्केट सेंटर रिझर्वेशन असा होता. त्यांना रुमबाबत विचारणा करुन रुम हवी असेल तर क्रेडिट कार्डची माहिती द्यावी लागेल असे सांगण्यात आले. (Pune News) त्यांनी क्रेडिट कार्डचा नंबर शेअर करतो परंतु, मी तुला सीव्हीपी क्रमांक देणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्याने सीव्हीपी क्रमांकाविना आम्ही रुम बुकिंग देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी सीव्हीपी क्रमांक दिला.
गोड बोलून विश्वास संपादन केल्यानंतर रुम बुकिंगसाठी तुमच्या क्रेडिट कार्डमधून १० रुपये क्रेडिट करत आहोत, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो सांगा, असे सांगितल्यावर त्यांनी ओटीपी सांगितला. त्यानंतर १० रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज मिळाला. (Pune News) त्याने फिर्यादी यांना पुन्हा फोन करुन हॉटेलच्या सिस्टिमध्ये तुमचे १० रुपये क्रेडिट झाल्याचे दाखवत नाही. तुम्हाला दुसरा ओटीपी येईल, तो सांगा, असे म्हटल्यावर फिर्यादी यांनी पुन्हा दुसरा ओटीपी शेअर केला. त्याबरोबर त्यांच्या खात्यातून ९१ हजार २८५ रुपये ट्रान्सपर झाल्याचा मेसेज आला.
संबंधिताला फोन केल्यावर तुमची रुम बुक झाली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, असे सांगून फोन कट करण्यात आला. (Pune News) आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चौकीच्या दारातच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला; पोलीस कर्मचार्याला अटक
Pune News : मराठा आंदोलनाला खेड तालुक्यात हिंसक वळण; टायर जाळून सरकारचा निषेध
Pune News : पुणे, पिंपरीत यंदा तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक फोडणार दहीहंडी…