Pune News : पुणे : शहराच्या विविध भागांत कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दर दोन दिवसांनी वेगळे प्रकरण पुढे येत आहे. कोयता दाखवून, दहशत माजवून नागरिकांना लूटण्याचे प्रकार सुरुच आहेत. कोयता दाखवून दहशत पसरविणाऱ्या या ‘गँग’चे पेव फुटले आहे. या अल्पवयीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी थेट पोलीसी खाक्या दाखविण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा सराव सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
मास्टर प्लॅन तयार…!
दरम्यान, कोयता दाखवून दहशत माजवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ही (मोक्का) प्रभावहीन ठरल्याने पोलिसांनी कोयता गॅंगची दहशत संपवण्याचा चंग बांधला आहे. (Pune News) पुण्याच्या मध्यवर्ती सदाशिव पेठ परिसरात तरुणीवर नुकताच कोयता हल्ला झाला. यामुळे पुणे पोलिसांना नामुष्कीला तोंड द्यावे लागले. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले.
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’नुसार गुन्हे दाखल करण्यात आले, तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ३४ कारवाया केल्या. (Pune News) दोनशेहून अधिक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. असे असले तरी कोयता गँगची दहशत कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पोलिसांकडून सध्या ठिकठिकाणी नव्याने उदयास येत असलेल्या ‘भाईं’ची कुंडली गोळा करण्यात येत आहे. याशिवाय पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबाराचा सराव देखीस सुरू केला आहे. गरज पडल्यास पिस्तूल वा बंदुकीचा वापर करण्यास देखील पोलीस धजावणार नाहीत, असा संदेश गुन्हेगारी जगतात पाठविण्यात आला आहे.
आयुक्त आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक कारवायांसह ‘बेसिक पोलिसिंग’कडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून सराईतांची धरपकड सुरू आहे.
दरम्यान, आयुक्त रितेशकुमार यांनी शुक्रवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवस्तीतील पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. सहआयुक्त संदीप कर्णिक येरवडा परिसरात लक्ष ठेवून होते. (Pune News) त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलीस चौकीत भेटले. त्यानंतर त्यांनी खडकी, स्वारगेट परिसरातही भेटी दिल्याने इतर पोलीस अधिकारी ‘दक्ष’ झाले होते. अशा प्रकारचे ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई पुणे पोलीस गेली आठवडाभर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मित्रांनीच केलं मित्राचं अपहरण ; ‘अडीच लाख घेऊन आलात, तरच तुमचा मुलगा वाचेल’. अन्यथा..
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन