Pune News : पुणे : अजित पवार गटाने भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट, अशी विभागणी झाली. राष्ट्रवादीतील काही दिग्गज नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. मात्र, काही नेते शरद पवार यांच्यासोबत ठामपणे वावरत होते. त्यातलेच एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील. आजही पाटील शरद पवार यांनाच समर्थन देत आहेत. असे असताना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेले विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. जयंत पाटील हे लवकरच अजित पवार गटात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
नवरात्रीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार
आत्राम म्हणाले की, जयंत पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यापैकी काही जण आमच्याकडे लवकरच येतील. जयंत पाटीलही आमच्याकडे येतील, (Pune News) अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे. निवडूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे पक्षचिन्ह त्यांना मिळण्यास हरकत नाही. अजितदादा फक्त विकासकामांसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह शंभर टक्के आमच्याकडे राहील, असा विश्वासही धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नवरात्रीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असेही आत्राम यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ड्रग तस्कर ललित पाटीलचे नेपाळला पलायन? गुन्हे शाखेची दहा पथके मागावर!