Pune News : पुणे : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना अजितदादा गटात आल्यास तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी ऑफर आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी छेडले असता त्या म्हणाल्या की, अजितदादा गटात गेल्यावर जयंत पाटलांना मुख्यमंत्री करणार असतील तर ही गोड बातमी आहे. मला याचा जास्त आनंद होईल. सुळे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सुळे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
या वेळी सुप्रिया सुळे यांनी आईस या शब्दाचा अर्थ फोड करून सांगितला. आईस म्हणजे बर्फ नाही, तर आईस म्हणजे आय. सी. ई. म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कोण बोलेल, त्याचा आईस होतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे. (Pune News) सरकार विरोधकांना संपवायलाच निघाले आहे. एक अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात कटकारस्थान करत आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या सुनावणीवर देखील सुळे यांनी हल्लाबोल केला. राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांना माहीत आहे. असे असतानाही भुजबळांची टीम निवडणूक आयोगात गेली. चिन्हाची लढाई लढतात, त्यांना परीक्षेला बसण्याआधीच निकाल माहीत आहे. याचाच अर्थ एकतर पेपर फुटलेला आहे किंवा दिल्लीतील अदृश्य शक्ती यांच्या कानात येऊन सांगते चिन्ह आणि पक्ष तुम्हालाच मिळणार आहे म्हणून… असा जोरदार टोला त्यांनी लगावला. (Pune News) छगन भुजबळ वयाने मोठे आहेत म्हणून मी त्यांना उत्तर देत नाही, असेही सुळे यांनी सुनावले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रेल्वेत नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणांची फसवणूक
Pune News : अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची बालमित्राला धमकी; तब्बल एक कोटींची फसवणूक