पुणे : Pune News-भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. (Pune News) हवामानशास्त्र विभागाकडील माहितीचा आरोग्य विभागाला चांगला उपयोग करुन घेता येईल, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. (Pune News)
पुण्यात महत्वाची बैठक पार पडली
एल निनो समुद्र प्रवाह आणि हवामान बदलाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख के. एस. होसळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी, डॉ. राजीव चटोपाध्याय यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाळ्यात होत असलेले हवामानबदल पाहता हवामानशास्त्र विभागाचे हवामान अंदाज, इशारे याकडे सर्वांचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेची लाट, पावसाचे अंदाज, वादळवारा आदींबाबतच्या अंदाजांची माहिती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी तसेच सर्वसामान्य व्यक्तीसाठी ही माहिती उपयुक्त असल्याने प्रत्येक गाव, ग्रामपंचायत तसेच गावातील व्हॉट्सॲप ग्रुपपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.
हवामानशास्त्र विभागाकडील विविध अंदाज, अहवालांचा उपयोग आरोग्य विभागाला हवामानबदलामुळे होणारे साथीचे आजार आदींविरोधात उपाययोजना करण्यासाठी होऊ शकेल. त्याचबरोबर याबाबतची संबंधित विभागांनीही आपली माहिती हवामानशास्त्र विभागाला उपलब्ध करुन दिल्यास संयुक्तपणे चांगले काम होऊ शकेल. पुणे हवामानशास्त्र विभागाच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. देशमुख यावेळी म्हणाले
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :