Pune News : पुणे : पुण्याच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला आहे. गिरीप्रेमी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गिर्यारोहण क्लबने थेट मेरू पर्वतावर यशस्वी चढाई करणारा पहिला भारतीय गृप बनला आहे.
गणेश मोरे (माउंट एव्हरेस्ट व माउंट च्योयु शिखरवीर), विवेक शिवदे (माउंट कांचनजुंगा, माउंट अमा दब्लम, माउंट मंदा शिखरवीर), वरुण भागवत (तरुण गिर्यारोहक, माउंट भ्रिगु पर्वत शिखरवीर), गिरीप्रेमींचे सदस्य आणि (Pune News) एव्हरेस्टसह विविध शिखरांवर अनेकवेळा चढाई केलेले जागतिक किर्तीचे गिर्यारोहक मिंग्मा शेर्पा आणि एव्हरेस्ट शिखरवीर आणि नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनोद गुसाई यांचा माउंट मेरू शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये समावेश आहे.
गिरीप्रेमीचे नाव जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये कोरले गेले
गढवाल हिमालयात हे मेरु पर्वत आहे. चढाईसाठी सगळ्यात कठीण अशी या पर्वताची ओळख आहे. ६६६० मीटरच्या प्रचंड उंचीवर उभा आहे. हा ट्रेक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक ट्रेकर हा ट्रेक करण्याचं स्वप्न पाहत असतात. (Pune News) मात्र पुण्यातील गिरीप्रेमी या गृपने यशस्वी चढाई करुन त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. याच वर्षी मे महिन्यामध्ये गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मेरू मोहीम आयोजित केली होती. मात्र खराब हवामानाने संपूर्ण मोहिमेदरम्यान संघाची परीक्षा पाहिली, शेवटी शिखरमाथा अवघ्या २०० मीटरवर असताना संघाला परतावे लागले होते. या मोहिमेतून आलेले अनुभव आणि शिकवणीचा फायदा यावेळी झाला.
दरम्यान, संघाचा मुक्काम २५ ऑगस्ट पासून किर्ती बमक ग्लेशियरवर वसलेल्या बेस कॅम्प (४८०० मीटर) वर होता. हिमालयात सतत होणाऱ्या पावसामुळे यावेळी देखील हवामान साथ देते की नाही? हा प्रश्न गिर्यारोहकांसमोर होता. (Pune News) मात्र, सुदैवाने हवामानाने यावेळी साथ दिल्याने शिखर चढाईसाठी मदत झाली.
कॅम्प १ (५५०० मीटर) पासून शिखरमाथ्यापर्यंत संपूर्ण खडी चढाई आहे. यात रॉक क्लायम्बिंग आणि आईस क्लायम्बिंग या दोन्हीच्या कौशल्यांची गरज भासते.(Pune News) गिरिप्रेमीच्या निष्णात आणि निपुण गिर्यारोहकांनी सलग दहा तास चढाई करून कॅम्प १ पासून पुढे शिखरमाथ्यावर चढाई केली आणि भारतीयच नव्हे तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नाव कोरलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या तब्बल ६०० एसटी बसला ब्रेक; प्रवाशांचे प्रचंड हाल
Pune News : हडपसर येथील २४ वर्षीय तरुणाचा भाटघर धरणात बुडून मृत्यू
Pune News : …अखेर तोतया लष्कर अधिकाऱ्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी पकडले