Pune News : पुणे : शहरात श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. सुमारे २५ टक्के रुग्ण श्वसनाच्या विकाराने त्रस्त असून, मुलांमध्ये हे प्रमाण ४० टक्के असल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. तापमानातील बदलामुळे रूग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत असून, यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
तापमानातील बदलामुळे रूग्णसंख्येत वाढ
शहरात सध्या तापमानात बदल झाल्यामुळे विषाणूजन्य आजार आणि न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. सध्या शहराचे तापमान ३० डिग्री सेल्सिअसच्या खाली आहे. रात्रीचे तापमान २२ डिग्री सेल्सियसच्या जवळ आहे. आर्द्रता पातळी सरासरी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यामुळे अल्पवयीन आणि प्रौढ व्यक्तींमध्ये श्वसनाच्या समस्या निर्माण होत आहेत. दरम्यान, श्वसनाच्या विकारामुळे त्रस्त असणारे अनेक रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाण मागील दोन आठवड्यांपासून वाढले आहे.
याबाबत बोलताना बालरोगतज्ज्ञ डॉ. काशीकर म्हणाले की, सध्या पुणे शहरातील हवामान थंड आहे. वातावरणात ओलसरपणा आहे, ऊनाचा अभाव आहे. (Pune News) सतत पाऊस पडत आहे. या वातावरणात आजाराचे संक्रमण वाढते. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढते. संसर्ग लवकर होतो. सध्या सुमारे ४० टक्के मुले या आजाराने त्रस्त आहेत.
तापमानातील बदलांप्रमाणेच हवेची गुणवत्ता खराब असल्याचे कारण देखील पुढे येत आहे. मुलांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर स्वरुपाचे परिणाम होताना दिसत आहेत. सतत खोकला येणे, सर्दी, संध्याकाळी खोकल्याची उबळ वाढणे, नाक गळणे, घसा दुखणे या तक्रारींमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. (Pune News) शहरातील सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.
सध्या लसीकरण केलेल्या मुलांना देखील हा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळाच्या तुलनेत या प्रकारातील रुग्णांचे प्रमाण ४० ते ५० टक्के वाढले आहे. फ्लू सारख्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याला कारण वातावरण हेच आहे. (Pune News) तापमानात सुधारणा झाल्यानंतर हे रुग्ण कमी होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. औषधोपचार योग्य पद्धतीने घेतल्यास तसेच घरगुती उपायांवर भर दिल्यास या आजारावर नियंत्रण आणणे शक्य आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चक्क झुरळांमुळे पुणे स्थानकावर दोन तास रेल्वेचा खोळंबा!
Pune News : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक