Pune News : पुणे : शेवाळवाडी परिसरातील एका स्वीटच्या दुकानात शिरून तीन गुंडांनी सामान घेतले. पैसे विचारले असता, तुम्ही बाहेरुन येऊन येथे धंदा करता, तुम्हाला धंदा करायचा असेल तर, तुम्हाला आम्हाला प्रत्येक महिना ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तसे नाही केल्यास तुला व तुझे दुकान देखील फोडीन, अशी धमकी देऊन दुकानात राडा घातला. हा प्रकार शेवाळवाडी येथील चैतन्य स्वीटससमोर रविवारी दुपारी घडला.
शेवाळवाडी येथील घटना
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी हिराराम चेनाराम देवासी (वय ३४, रा. शेवाळवाडी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार पोलिसांनी अजय साळुंके (वय २०), शुभम गवळी, सुदाम साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शेवाळवाडीत फिर्यादीचे चैतन्य स्वीटस हे दुकान आहे. ते दुकानात असताना तिघे गुंड दुकानात आले. अजय साळुंके याने पाणी बाटली, बाकरवडी तसेच रेड बुल ड्रिंक घेतले. (Pune News) फिर्यादींनी त्याचे पैसे मागितल्यावर, तुम्ही बाहेरुन येऊन येथे धंदा करता, धंदा करायचा असेल तर, तुम्हाला आम्हाला प्रत्येक महिना ५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही तुला व तुझे दुकान देखील फोडीन, अशी धमकी दिली.
दरम्यान, धमकी देत, शिविगाळ करून ते दुकानाबाहेर आले. लोखंडी हत्यार हातात घेऊन, ते हवेत फिरवून दहशत माजवली. मोठ्यमोठ्याने आरडाओरडा करीत येथे जर धंदे करायचे असतील तर प्रत्येकाने आम्हाला प्रत्येक महिन्याला हप्ते द्यावे लागतील, (Pune News) नाही तर एकएकाला त्याच्या दुकानासोबत फोडून टाकू, असे बोलून वातावरण तापवले.
या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना मिळणार ‘स्वातंत्र्य’