Pune News : पुणे : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच बनावट चावीने हॉटेलचे कुलूप उघडत रोकड व साहित्य चोरी केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. दरम्यान या कामगांना चोरी करताना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून चोरीतील रोख व साहित्य पोलीसांनी जप्त करून घेतले आहे. शनिवारी रात्री मालक हॉटेल बंद करुन घरी गेल्या नंतर हा प्रकार गंगाधाम बिबवेवाडी येथील हॉटेलमध्ये घडला आहे. (Hotel workers committed theft in the hotel itself)
गंगाधाम बिबवेवाडी येथील येथील घटना
याप्रकरणी नितीन राजाराम कोंढाळकर (वय ५२, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. नूर आलम ऊर्फ साबीर अकबर शेख (वय ३०), इम्रान मोहंमद सलीम शेख ऊर्फ राजेश जॉन शेख (वय २०), जहांगीर नजिरुल मोल्ला (वय २७, सर्व रा. दक्षिण २४, परगणा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे बिबवेवाडीत हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये तिनही आरोपी हे कामगार आहेत. दरम्यान तक्रारदार कोंढाळकर हे शनिवारी रात्री हॉटेल बंद करुन घरी गेले.(Pune News) त्यानंतर त्यांच्याकडील कामगारांनी बनावट चावीने हॉटेलचे कुलूप उघडले व आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील १० हजार रुपये रोकड, होम थिएटर, एम्प्लीफायर, डीव्हीआर, डीव्हाईस, कॅमेरे, राऊटर असे एकूण ५० हजार ७०० रुपयांचा माल चोरला व हॉटेलमधील नुकसान केले.
दरम्यान, चोरीचा हा माल ते घेऊन जात असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालणार्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यातून चोरीचा हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय; कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल