पुणे : दुचाकी चालवताना अनेकदा हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ केली जाते. पण आता हे करणं महागात पडणार आहे. कारण पुणे आरटीओने जिल्ह्यातील सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. जर या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पुणे आरटीओकडून गेल्या तीन महिन्यांपासून या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रस्ते अपघातात वारंवार वाढ होताना दिसत आहे. त्यात हेल्मेट नसल्याने मृत्यू ओढवत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता पुणे आरटीओने सर्व कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. रस्त्यावर हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाहीतर सायकल चालवताना हेल्मेट वापरणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे.
पुणे आरटीओकडून आत्तापर्यंत 1744 कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. रस्ते अपघाताचे प्रमाणात वाढ होत आहे. या अपघातांमध्ये 70 ते 80 टक्के दुचाकी आणि पादचारी यांचा समावेश आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुठं विरोध तर कुठं स्वागत
आरटीओच्या या निर्णयावर यापूर्वी संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काही नागरिकांनी त्याचे स्वागत केले तर काहींनी विरोध केला. पण तरीदेखील आरटीओकडून अशा कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.