Pune News : पुणे : शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी ही गंभीर बाब बनत आहे. पुणेकर कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पुणेकरांना तासभर लागतो. इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहरात वाहनांचे प्रमाण जास्त आहे. परंतु रस्त्यांना मर्यादा आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. आता ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी तब्बल २७ हजार कोटींच्या प्रकल्पास लवकरच सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर, शिवापूर आणि पिरंगुट या भागांना रिंगरोड प्रकल्प जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कमी होईल. तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
पुणे शहराभोवती १७२ किलोमीटरचा रिंगरोड प्रकल्प आकारास येणार आहे. या प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहणासाठी पाच हजार जणांना नोटिस देण्यात आल्या आहेत. हवेली, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यांतील ३२ गावांमधील शेतकऱ्यांना नोटिस पाठवण्यात आल्या असून, यावर जुलै अखरेपर्यंत उत्तर मागवले आहे. (Pune News ) त्यानंतर तत्काळ काम सुरू करण्यात येणार आहे.
काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार
रिंगरोड प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जमीन मालकांना याबाबत नोटिस दिल्या आहेत. भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. (Pune News ) या प्रकल्पासाठी एकूण ८७ गावांची १९०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाईल. तसेच अंदाजे खर्च २६ हजार ८०० कोटी रुपये येईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ५ हजार ८०० कोटींचा निधी मिळाला आहे. प्रकल्पाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (Pune News ) रिंगरोड पिंपरी चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर, शिवापूर आणि पिरंगुट या भागांना जोडणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कमी होईल. तसेच शहरातील रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.
रिंगरोड प्रकल्पासाठी रेल्वेमार्गावर चार पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच ७ मार्गिका, १४ भूमिगत रस्ते आणि १३ बोगदे रिंगरोडमध्ये आहेत. या रिंगरोडमध्ये आठ उड्डाणपूल असणार आहेत. या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय..उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
Pune News : कोयता गँगच्या मुसक्या आवळणार; पोलिसांचा मोठा निर्णय